संघाला मिळेल शिवाजी पार्कमध्ये जागा?

संघाला मिळेल शिवाजी पार्कमध्ये जागा?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जागेत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाची अडचण होत आहे. त्यामुळे अडचणीचे कारण देत दादारमधील शिवाजी पार्क जवळील मोकळा भूखंड आरेखन करून भाडे तत्वावर जागा द्यावी, अशी मागणी संघाने पात्राच्या माध्यमातून केली आहे.

दादरमधील शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर असलेल्या मोकळ्या भूखंडाची भाडेपट्टी वर्ष १९६७पासून महापालिकेने दिलेली आहे. १९६७ पासून २००७ पर्यंत मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वितरित केलेल्या या १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे प्रशाकीय अडचणींमुळे २००८ पासून थकीत आहे. जागेचे आरेखन झाले नसल्यामुळे हे भाडे थकीत आहे, असं संघाने म्हंटले आहे. तसेच, स्मृतीस्थळामुळे उपक्रम राबवायला अडचणी येत आहेत तर जागेचे आरेखन ही रखडले आहे. त्यामुळे स्मृतिस्थळाऐवजी शिवाजी पार्क जवळील मोकळा भूखंड भाडेतत्वावर द्यावा, अशी मागणी आरएसएसने केली आहे.

याप्रकरणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणीवर शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version