Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रातून संकट गडद; पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रातून संकट गडद; पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने राज्यातील हवामान ढवळून निघाले आहे. या परिस्थितीमुळे पुढील पाच दिवस अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे.
 
गुजरात किनाऱ्यावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून, त्यामुळे पुढील 48 तास निर्णायक ठरणार आहेत. यामध्ये टर्फ लाईनची महत्त्वाची भूमिका असून, तिचा परिणाम राज्यभर जाणवेल. त्याचवेळी आंध्र प्रदेशाजवळ आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिण भारतासोबत मध्य भारतातही हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत.
 
या हवामान बदलांचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. कोकण किनाऱ्यावर मुसळधार पावसाचा जोर अपेक्षित असून, पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्येही जोरदार सरींचा अंदाज आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्येही पाऊस वाढेल. कधी ऊन तर कधी मुसळधार सरी अशा स्वरूपाचा पाऊस पडेल, त्यामुळे मान्सूनचा प्रवास आणखी लांबणीवर पडणार असल्याचे संकेत आहेत.
 
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला नाही. मात्र, जर कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पुढील दोन दिवसांत वाढली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि रेड अलर्टचा इशारा देण्यात येऊ शकतो.
 
त्यामुळे नागरिक आणि शेतकरी यांनी हवामान विभागाच्या सूचनांनुसार खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसाचा फटका लक्षात घेऊन शेतीचे नियोजन काळजीपूर्वक करावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version