‘टोल वसुली करणाऱ्यांची चौकशी करा’

महाराष्ट्र शासनाने मुंबई येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘टोल वसुली करणाऱ्यांची चौकशी करा’

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मुंबई येणाऱ्या – जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी या वाहनांना मुंबईत येण्याजाण्यासाठी ४० रुपये टोल आकारला जात होता. हा टोल माफ करण्यात आला आहे. नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. पण टोल वसुली करणाऱ्या खासगी कंपनीची चौकशी करावी आणि किती टोल वसूल केला तसेच त्याचा कसा विनियोग झाला याची माहिती जाहीर करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. टोल प्रकरणी पारदर्शकता राखण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version