Andheri Shopping Mall Fire: अंधेरी पश्चिमेतील प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पोलिसांनी आणि प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. 
Andheri Shopping Mall Fire: अंधेरी पश्चिमेतील प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातील एस. व्ही. रोडवरील बोनी प्लाझा शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीनंतर संपूर्ण परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पोलिसांनी आणि प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, मॉलमधील अनेक दुकाने आणि गाळ्यांना आगीची झळ बसली असून काही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, आग इतर भागात पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्टसर्किट, विद्युत बिघाड किंवा अन्य कोणते कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतर तपास यंत्रणा घटनास्थळाची पाहणी करून कारणांचा शोध घेणार आहे. सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्तही अद्याप मिळालेले नाही. मात्र, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version