अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा

अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल म्हणून केला. त्यामुळे विद्या चव्हाणांच्या डांन्सिंग डॉल या विधानावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत विद्या चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी अपमान करते, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागले, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण. यासोबत अमृता फडणवीस यांनी मानहानीच्या दाव्याची प्रत जोडली आहे. तसेच मानहानी नोटीस वाचा आणि आणि सुधार स्वत:ला मगच मिळेल तुला निर्वाण! असे ट्विट अमृती फडणवीस यांनी केले आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, तुम्ही रश्मी ठाकरे यांना राबडी देवीची उपमा दिली ते बरं झाले. एका प्रकारे त्यांनी गजारिया यांची साथ दिली. मात्र जर फडणवीसांच्या पत्नीची दिली असती तर डान्सिंग डॉल अशी त्यांची प्रतिमा झाली असती. निदान अशी वाईट प्रतिमा त्यांनी नाही आहे. थोडक्यात रश्मी ठाकरे वाईट नाहीत, असे त्या म्हणाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version