आदित्य ठाकरेंची ‘शिव संवाद’ यात्रा

आदित्य ठाकरेंची ‘शिव संवाद’ यात्रा

महाराष्ट्रातील जनतेशी आणि लाखो मनांशी संवाद साधण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, दि. २१ ते २३ जुलै दरम्यान भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी असा पहिला टप्पा पार पडणार आहे. यात्रेचा प्रारंभ हा दि. २१ जुलै २०२२ रोजी, भिवंडी येथून दुपारी १२.०० वाजता होईल. तर यात्रेची सांगता २३ जुलैला र्शिडी येथे होईल. लोकांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांना चिंतामुक्त करणे हेच संकल्पित शिवसंवादाचे उद्दिष्ट आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या संवाद यात्रेला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याहूनही अधिक म्हणजे ही संवादयात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणणारी ठरणार आहे.

या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचा बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच याअगोदर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा यात्रा काढून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. याशिवाय आदित्य ठाकरे पुढे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र दौऱ्याचेही नियोजन करणार असल्याचे समजते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version