आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गदारोळ झाला. पहिल्या दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. तर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत होते. त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होत असताना नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ करत मांजराचा आवाज काढून त्यांना डिवचलं.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात येताच, आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजप नेते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.
राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणजेच बुधवारी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील ‘संघर्षामुळे’ गाजला. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष भाजप आक्रमक दिसला. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधी पक्ष सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.