मुंबईत एका व्यक्तीने महिलेवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबईत लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या ५४ वर्षांच्या एका महिलेवर अॅसिड हल्ला झाला आहे. हल्लेखोर हा तिचाच लिव्ह पार्टनर आहे. महेश पुजारी, असं या हल्लेखोराचं नाव असून हल्लेखोर ६२ वर्षांचा आहे. हे दोघेही काळबादेवीजवळील चाळीत राहतात.
शुक्रवारी सकाळी ही महिला पाण्याची टाकी भरण्यासाठी उठली असता ही घटना घडली.
‘महेश पुजारी याचे त्याच्या साथीदारासोबत भांडण झाले त्यामुळे महिलेवर अॅसिड फेकले, असे लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सांगितले.
अॅसिडने भाजलेल्या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
‘दोघेही २५ वर्षांपासून एकत्र राहत होते, महेश पुजारी याच्या दारूच्या सवयीमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती’, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई यांनी सांगितली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.