आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण करणं बांगर यांना चांगलच भोवलं आहे. आमदार बांगर यांनी तेथील सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगतच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली असल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेवरून प्रचार्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version