‘ऑफिसमध्ये या, नाहीतर…’

‘ऑफिसमध्ये या, नाहीतर…’

मुंबई, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. भारताने कोरोना संकटावर मात केली आहे… परिस्थिती नियंत्रणात आहे… घरून काम करण्याची व्यवस्था बंद केली आहे… ऑफिसमध्ये या आणि काम करा, नाहीतर पगार कपातीला सामोरे जा… असा इशारा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनी प्रमाणेच देशातील बहुसंख्य कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘ऑफिसमध्ये या आणि काम करा’ असेच सांगितले आहे. काही कंपन्यांनी तर जे काम करण्यासाठी ऑफिसला येणे टाळत आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version