गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्यग्रहण, पण…

गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्यग्रहण, पण…

मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : या वर्षातले पहिले सूर्यग्रहण गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी सुरू होईल आणि गुढी पाडव्याच्या दिवशी संपेल. सूर्यग्रहणाची सुरुवात फाल्गुन अमावस्येला होईल. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत येतील. सूर्यग्रहणाची सुरुवात ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी सुरू होणार आहे. हे ग्रहण ९ एप्रिल रोजी पहाटे १ वाजून २० मिनिटांनी संपणार आहे. सूर्यग्रहमाचा कालावधी हा पाच तास आणि दहा मिनिटांचा आहे.

यंदाच्या वर्षातले पहिले चंद्रग्रहण भारतात दिसले नव्हते. तसेच यंदाच्या वर्षातले पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचे सूतक पाळणारे भारतात असतील तर त्यांना सूर्यग्रहणाचे सूतक पाळण्याची आवश्यकता नाही. यंदाच्या वर्षातले पहिले सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको आणि न्यूफाउंडलँडच्या काही भागांमध्ये दिसेल. तसेच कोस्टा रिका, क्युबा, डॉमिनिका, फ्रेंच पॉलिनेशिया, जमैका, आयर्लंड, इंग्लंडचा वायव्येकडील भाग, पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिकमध्ये हे सूर्यग्रहण दिसेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version