अमेरिकेत राम मंदिर रथ यात्रा

अमेरिकेत राम मंदिर रथ यात्रा

शिकागो, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : अमेरिकेत धूलिवंदनाच्या दिवसापासून म्हणजेच सोमवार २५ मार्च पासून साठ दिवसांची राम मंदिर रथ यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा अमेरिकेतील ४८ प्रांतांमधून जाणार आहे. रथ यात्रा अमेरिकेतील ८५१ मंदिरांमध्ये जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून आठ हजार मैलांचा अर्थात १२ हजार ८७५ किलोमीटरचा प्रवास केला जाईल. राम मंदिर रथ यात्रेचा समारोप २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी इलिनॉइसमधील शुगर ग्रोव येथे होणार आहे. या यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version