मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : डोंबिवली येथे मोरया प्रकाशन व ब्राम्हण सभा ग्रंथालय समिती यांच्या संयुक्तविद्यमानाने पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक भाऊ तोरसेकर लिखित “फक्त मोदीच” या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.
मोदींचे विरोधक हे फुले, शाहू, आंबेडकर यांना मिठासारखं वापरतात अशी टीका भाऊ तोरसेकर यांनी भाषणात केली. पुढे ते म्हणाले, फुले शाहू, आंबेडकर यांनी ब्रिटिशाविरोधात लढाई केली नव्हती त्यांनी प्रस्थापितांविरोधात केली होती. तेव्हा प्रस्थापित समाज बदलण्याची गरज होती, सरकारविरोधात लढाई नव्हती. तुम्ही फुले शाहू, आंबेडकर यांच्याकडून काय शिकलात असा सवालही भाऊ तोरसेकर यांनी केला.
पुस्तक प्रकाशनानंतर भाऊ तोरसेकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले, मोदींसाठी ही निवडणूक खूपच सोपी आहे कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०४७ पर्यंतची तयारी करत असून मोदी पुढील २५ वर्षे देशाच्या भवितव्याचा विचार करत आहेत. तुम्ही लोकं २०१९, २०२४ कडे बघताय पण हा माणूस २५ वर्षे पुढे बघतोय. आता गावस्कर यांच्या स्टाईलने क्रिकेट चालत नाही, आता कोहली लागतो, नरेंद्र मोदींचे विरोधक आळशी आहेत. त्यामुळे मोदींना ही निवडणूक सोपी झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.