भाजपा महामंत्री मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपा महामंत्री मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे महामंत्री आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मुरजी पटेल यांनी २०१७ ची महानगरपालिका निवडणूक अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून लढवली होती. निवडणूक लढताना लेवा पाटील जातीचे प्रमाणपत्र वापरले होते. मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी वेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने वांद्रे महानगर दंडाधिकारी, न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईच्या शाहूनगर पोलीस ठाण्यात मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र दिले होते. ते देखील बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने मुरजी पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुरजी पटेल यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version