इंडिगोला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वावडे

इंडिगोला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वावडे

पोर्ट ब्लेअर, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर अंदमान येथे गेले होते. इंडिगोच्या विमानात अंदमानच्या विमानतळाची घोषणा “पोर्ट ब्लेअर विमानतळ” अशी केली जात होती. प्रत्यक्षात या विमानतळाचे नाव “वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे आहे. घोषणा देताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख टाळला जात होता. हे देवधर यांना प्रचंड खटकले. त्यानंतर, त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांची लगेच कानउघाडणी केली. हवाई वाहतूक मंत्रालयानेही या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे.

महत्त्वाचे मुद्दे

इंडिगोला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वावडे
विमानतळाचे नाव अर्धवट घेतल्याने वाद
इंडिगोच्या विमानातच झाली कानउघाडणी
हवाई वाहतूक मंत्रालयाकडून तक्रारीची गंभीर दखल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version