नाशिककरांसाठी अयोध्या प्रवास होणार सुखकर

नाशिककरांसाठी अयोध्या प्रवास होणार सुखकर

नाशिक , ६ मार्च २०२४ , प्रतिनिधी : नाशिकहून अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी खास बातमी. नाशिकहून अयोध्येकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येचा प्रवास सुखकर होणार आहे. सध्या रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी २४ ते ३० तासांचा प्रवास करावा लागतो परंतू येत्या ३१ मार्चपासून नाशिकहून नाशिक लखनौ विमानसेवा सुरू होणार त्यामुळे श्रीरामाचे दर्शन अवघ्या काही तासांमध्ये होईल. या विमानसेवेमुळे भक्तांना अवघ्या ५ ते ६ तासांत अयोध्येला पोहोचता येणार आहे.

लखनौहून अयोध्येला कसे जाल?

लखनौहून अयोध्येला जाण्यासाठी टॅक्सीने तुम्हाला साधरणत: २ ते ३ तासांचे अंतर कापावे लागेल. या ठिकाणाहून ट्रेनसुद्धा जाते. लखनौहून अयोध्येला ट्रेन मार्गेही जाऊ शकता. ट्रेन साधरणत: अयोध्येला पोहोचवण्यासाठी ४ तास घेईल. जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीटासाठी किमान २०० रुपये मोजावे लागतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version