शाळा सकाळी ९ वाजता

शाळा सकाळी ९ वाजता

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आता सकाळी ९ किंवा सकाळी ९ नंतर सुरू करण्यात येतील. यासाठीचे शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुलांची रात्रीची झोप पूर्ण होऊ शकेल. काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ९ नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवले होते. या सूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणइ सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी तसेच त्यांना अपुऱ्या झोपेमुळे होणारे त्रास होऊ नयेत यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version