‘उद्धव सरकारमुळे दहा हजार कोटींचे नुकसान’

‘उद्धव सरकारमुळे दहा हजार कोटींचे नुकसान’

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव सरकारने मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत जे काही केले त्यामुळे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. सर्व बाजू तपासून मेट्रोसाठी आरे कारशेडला मंजुरी दिली होती. पण उद्धव यांनी त्यांच्या कार्यकाळात हा मुद्दा वैयक्तिक प्रतिष्ठेचा केला आणि आवश्यक तो निर्णय घेणे टाळले. यामुळे झालेल्या दिरंगाईने दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले; असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी मेट्रो आणि आरे कारशेड बाबतच्या मुद्यावर बोलताना उद्धव सरकारमुळे झालेल्या आर्थिक हानीची माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version