शिवसेनेच्या माजी आमदाराचे निधन

शिवसेनेच्या माजी आमदाराचे निधन

मुंबई, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेचे वांद्रे- खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले. ते मागील काही वर्षांपासून आजारी होते. श्रीकांत सरमळकर यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. जुन्या पिढीचे शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या श्रीकांत सरमळकर यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथून काही काळानंतर परतलेल्या श्रीकांत सरमळकर यांनी २०११ मध्ये उद्धव यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असे कुटुंब आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version