नवी दिल्ली, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रियांका गांधी यांचे नाव ईडीने आरोपपत्रात दाखल केले आहे. यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आरोपपत्रात प्रियांका यांचा उल्लेख आरोपी असा नाही. पण ईडीच्या आरोपानुसार भूखंड व्यवहाराशी प्रियांका यांचा संबंध आहे. प्रियांका यांच्यासोबतच त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचाही आरोपपत्रात समावेश आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, संजय भंडारीचा कथित सहकारी सीसी थंपी याने २००५ ते २००८ या कालावधीत हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील अमीपूर गावात ४८६ एकर जमीन दिल्ली-एनसीआरचे रिअल इस्टेट एजंट एचएल पाहवा यांच्यामार्फत खरेदी केली होती. रॉबर्ट वाड्रा यांनी २००५ – २००६ मध्ये एचएल पाहवा यांच्याकडून अमीपूरमध्ये ३३४ कनाल (40.08 एकर) जमिनीचे तीन तुकडे खरेदी केले आणि डिसेंबर २०१० मध्ये तीच जमीन एचएल पाहवा यांना विकली. ज्याच्याकडून जमीन खरेदी केली त्यालाच ती परत विकण्यात आली. या भूखंड व्यवहारातून आर्थिक अफरातफर करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.