आमदार अपात्रताप्रकरणी विधिमंडळात सुनावणी

आमदार अपात्रताप्रकरणी विधिमंडळात सुनावणी

मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शनिवारी मुंबईतील विधिमंडळामध्ये अखेरची सुनावणी पार पडत आहे. यानंतर थेट नागपूर येथील विधिमंडळामध्ये ७ डिसेंबर पासून सुनावणी होणार आहे. आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशी यांचीही उलट साक्ष घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. याउलट नागपूर या ठिकाणी होणाऱ्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील हे शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची उलट साक्ष घेताना पाहायला मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version