रिझर्व्ह बँकेचा निर्णय, कर्जाच्या सापळ्यात अडकणाऱ्यांना वाचवणार

रिझर्व्ह बँकेचा निर्णय, कर्जाच्या सापळ्यात अडकणाऱ्यांना वाचवणार

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : झटपट पैसे मिळतात म्हणून अनेकजण कर्ज घेतात. विनातारण कर्ज घेण्याचे प्रमाण पण वाढत आहे. वैयक्तिक कर्ज अथवा क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त आहे. हे कर्ज घेणारे नंतर आर्थिक नियोजनाचा अभाव असल्यामुळे कर्जबाजारी होतात. या परिस्थितीतून सामान्यांची सुटका करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कर्जाबाबतची नवी कठोर नियमावली तयार केली आहे. तसेच म्युच्युअल फंड तारण ठेवून कर्ज घेण्याची मुभा दिली आहे. सध्या म्युच्युअल फंड तारण ठेवून नऊ टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे. म्युच्युअल फंड तारण ठेवून कर्ज घेण्याच्या योजनेमुळे नागरिकांची गुंतवणूक करण्याची सवय कायम राहते. तसेच आर्थिक शिस्त जपण्यास मदत होते.

आकडेवारी
वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्ज १५ ते १८ टक्के दराने उपलब्ध
आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत क्रेडिट कार्ड कर्ज – २९.९ टक्क्यांची वाढ
आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत वैयक्तिक कर्ज – २५.५ टक्क्यांची वाढ
भारतात म्युच्युअल फंडात ४७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
म्युच्युअल फंड तारण ठेवून ९ टक्के दराने कर्ज उपलब्ध

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version