मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना मांडली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल , पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version