फलाट तिकिटांची विक्री बंद

फलाट तिकिटांची विक्री बंद

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिवाळीची सुटी संपवून परतणारे आणि छटपूजेसाठी उत्तर भारतात जाणारे यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर २४ नोव्हेंबरपर्यंत मर्यादीत वेळेसाठी फलाट तिकिटांची विक्री बंद राहणार आहे. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानक – २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘या’ वेळेत फलाट तिकिटांची विक्री बंद
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – संध्याकाळी सहा ते मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत
२. दादर – संध्याकाळी सहा ते मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत
३. ठाणे – संध्याकाळी सात ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत
४. कल्याण – संध्याकाळी सहा ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत
५. लोकमान्य टिळक टर्मिनस – संध्याकाळी साडेसहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत
६. पनवेल – रात्री अकरा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version