गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर आहेत. गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. मागील तीन मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नाहीत. यावर्षी केवळ ६५ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. ही माहिती माहिती अधिकारातून कळली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मागितली होती. शासनाने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक एप्रिल २०२२ रोजीची शिल्लक रु ४१८.८८ कोटी रुपये आणि ३१ मार्च २०२३ रोजी शिल्लक ४४५ .२२ कोटी रुपये आहे.

निधीत सर्वाधिक वाढ

मुख्यमंत्री असताना पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी ६१४ कोटींची वाढ केली तर दोन वर्षात उद्धव ठाकरे यांनी ७९३ कोटींची वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ६५.८८ कोटींची वाढ केली.

गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

मागील आठ वर्षात तीनही मुख्यमंत्र्यांत गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात एक लाख सात हजार ७८२ अर्ज प्राप्त झाले. यापैकी ६३ हजार ५७३ नागरिकांना ५९८.३२ कोटींची मदत करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी दहा हजार ७१२ पैकी चार हजार २४७ नागरिकांना २०.२८ कोटी रुपयांची मदत केली तर एकनाथ शिंदे यांनी चौदा हजार ५६६ पैकी ७४१९ नागरिकांना ५७ कोटींची मदत केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version