डम्पिंग ग्राऊंडचा नागरिकांना त्रास

डम्पिंग ग्राऊंडचा नागरिकांना त्रास

मुंबई, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: सध्या मुंबईतील वाढत्या वायू प्रदुषणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्यातच आता मुंबई उपनगरातील गोवंडी येथील मोठं डम्पिंग ग्राउंड चर्चेचा विषय बनला आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे लहान बालकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दम्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच सतत वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते आहे. याच डम्पिंग ग्राउंड लगत जनावरांची विद्युत शवदाहिनी सुद्धा उभारण्यात येणार आहे. अशी माहिती मिळत आहे. ज्यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. सोबतच या प्रदूषणाचा मोठा फटका परिसरातील राहणाऱ्या लोकांना बसत आहे.

मुंबईतील हॉस्पिटल वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, सॉलिड वेस्ट हे सर्व याच डम्पिंग ग्राउंडमध्ये आणले जातात. असा नागरिकांचा आरोप आहे. मुंबई उपनगरातील गोवंडी डम्पिंग ग्राउंड हे कोणत्या प्रकारचं चाचणी केंद्र आहे का? असा प्रश्न येतील नागरिकांना पडत आहे. तसेच महानगरपालिकेकडून बऱ्याच उपाय योजना सुद्धा राबवण्यात येत आहेत. पण त्या कमी पडत आहेत का? हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version