‘जात पडताळणीचे नियम शिथील करा’

‘जात पडताळणीचे नियम शिथील करा’

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी जात पडताळणीचे नियम शिथील करा, असे मनोज जरांगे पाटील समर्थक डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे असेही कोठावळे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या चर्चेत डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी या मागण्या केल्या. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या ‘लक्षवेधी’ या कार्यक्रमात ‘सरसकट कुणबी म्हणजे सरसकट दिशाभूल’ या मुद्यावर झालेल्या चर्चेत ते सहभागी झाले होते. याआधी गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण फळांचा रस पिऊन सोडले. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला २ जानेवारी पर्यंतची मुदत देत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version