मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ललित पाटील आणि सचिन वाघ या दोघांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोघांना पोलीस कोठडी दिली.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला बंगळुरूतून अटक करून मुंबईत आणण्यात आले. यानंतर ललित आणि त्याचा सहकारी सचिन वाघ या दोघांना मुंबईत अंधेरी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अंधेरी न्यायदंडाधिकारी यांनी ललित पाटील आणि सचिन वाघ या दोघांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.