मुंबई पोलीस दलात तीन हजार पदांची कंत्राटी पदभरती

मुंबई पोलीस दलात तीन हजार पदांची कंत्राटी पदभरती

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई पोलीस दलात ११ महिन्यांसाठी कंत्राटी पोलिस भरती करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे. तब्बल तीन हजार कंत्राटी पदे भरली जाणार असून यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. सध्या मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. नवी पोलिस भरती होण्यासाठी अवधी असून तो पर्यंत ही कंत्राटी पदे भरली जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी राज्यशासनाला विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

कंत्राटी पदभरतीवर राजू शेट्टींची टीका

‘मुख्यमंत्रीपद, सरकारसुद्धा कंत्राटी पद्धतीनेच भरा’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version