मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे. विमानतळावर कचरा कुंड्या भरल्या आहेत आणि शौचालये तुंबली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांकडून विमानतळ प्रशासनाकडे अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे, पण विमानतळ प्रशासनाकडून आवश्यक उपाय होत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.
संप मागे घेतला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेतून तोडगा निघाला असून संप मागे घेण्यात आला आहे. रात्रीच्या शिफ्टपासून सफाई कर्मचारी कामावर परतणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे पुढील काही तासांत पुन्हा एकदा विमानतळ स्वच्छ, सुंदर, नेटका दिसू लागेल, असे समजते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.