मुंबई, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगितीचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्थगित आदेश देण्यात आला आहे.
जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ३५९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. पण एवढी मोठी नैसर्गिक हानी करून जलाशयाच्या पुनर्बांधणी करण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेऊन मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती दिली आहे. नैसर्गिक हानी न करता जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. समिती सुचवेल त्या पर्यायाद्वारे निसर्गाचे रक्षण करत मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केली जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.