मुंबई, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अंधेरी जवळ ओशिवरा परिसरातील हिरापन्ना मॉलला आग लागली. या दुर्टनेत जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ बंब पोहोचले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या कामात अडथळे येऊ नयेत यासाठी पोलिसांनी परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यास सुरुवात केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.