भाजयुमोकडून शुभनीत सिंगला विरोध

भाजयुमोकडून शुभनीत सिंगला विरोध

मुंबई, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: कॅनेडियन पॉप गायक शुभनीत सिंग उर्फ शुभ खलिस्तानचे समर्थन केल्याच्या आणि काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २४-२५ सप्टेंबर रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ वर त्याचा क्रूझ कंट्रोल ०.४ हा कार्यक्रम होणार होता तेव्हा हा वाद झाला. सत्ताधारी भाजपाच्या युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाने (बीजेवायएम) त्याच्या मैफिलीला कडाडून विरोध केलेला आहे. बीजेवायएमने त्याच्यावर खलिस्तानचे समर्थन केल्याचा आणि काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचा आरोप केला आहे.

मुंबईतील भाजपच्या युवामोर्चाच्या आघाडीने पोलीस आयुक्तांना निवेदनही दिले असून, त्याच्या कार्यक्रमाचे पोस्टर फाडण्यात आले आणि त्याच्या फोटोला काळे फासण्यात आले. दरम्यान, शुभनीत सिंगवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशातील त्याचे सर्व कार्यक्रम रद्द व्हावेत, अशी मागणी भाजपाच्या युवामोर्चाच्या आघाडीने केलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version