‘मी पक्षाशी एकनिष्ठ’

‘मी पक्षाशी एकनिष्ठ’

उद्धव गटाचे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना पदावरून हटवले. नाईकांना हटवल्यानंतर तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली होती. यामुळे त्यांना पदावरून हटवल्याचे बोलेले जाते. मात्र आपल्याकडे पक्षवाढीसाठी जबाबदारी दिल्याने, जिल्हाप्रमुख पद काढून घेतले आहे, असे स्पष्टीकरण नाईक यांनी माध्यमांना दिली आहे. “भाजप आणि शिंदे गटात येण्यासाठी अनेक लोक मागे लागले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या दबावाला झुकारुन मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिलोय. गेले १५ वर्ष मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. तरुणांना आता संधी दिली आहे. मी आता जिल्ह्याबाहेर काम करणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी मला हटवलं असेल.” अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

आता निष्ठावान समजले जाणारे नाईक यांचीच महत्त्वाच्या पदावरून गच्छंती झाल्याने, पक्षांतर्गत टिकेचा सूर उमटू लागल्याचे सूत्रांची माहिती आहे. नाईक यांना पदावरून हटवल्यानंतर, नव्याने ज्यांची नियुक्ती करण्यात आली, ते पूर्वी राणे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे निष्ठावंतांना डावलून पूर्वीच्या राणे समर्थकांना पदे का दिली जात आहेत? असे प्रश्न पक्षांतर्गत उमटू लागल्याची चर्चा आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version