अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन

अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन

‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे अभिजीत बिचुकले होय. अभिजीत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.धमकीमुळे ताबडतोब माझ्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने मला पोलिस संरक्षण देऊन मला धमकीक देणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.

अभिजीतच्या म्हणण्यानुसार, कसबा निवडणूक आयोगातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी हा धमकीचा फोन आल्याचं म्हटलं आहे. या धमकीनंतर अभिजीत बिचकुलेने त्वरित आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. अभिजीत बिचुकलेने लिहिलं आहे,”मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून मी अर्ज मागे घ्यावा तसेच पुणे सोडून साताऱ्याला जावं आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू अशी धमकी देण्यात आली आहे”. तसेच, माझ्या पत्नीच्या मोबाईलवरही धमकीचे कॉल आले आहेत, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version