उद्धव गट आणि शिंदे गट यांपैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार या मुद्द्यावर मंगळवार १७ जानेवरी, २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार होती, पण आता ही सुनावणी शुक्रवार २० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
दरम्यान मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने उद्धव गटाचा दावा फेटाळला आहे. ‘शिवसेनेला गळती लागली आहे हे वास्तव आहे’, असं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने केले आहे. ‘बहुमत आमच्याकडेच आहे त्यामुळे चिन्ह आम्हालाच हवे’, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला आहे.
अशा युक्तिवादामुळे शुक्रवारी धनुष्यबाणावर होणारी सुनावणी महत्वाची ठरणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.