Video: मुंबईत ग्रांट रोड येथे एका इमारतीला भीषण आग, 3 गंभीर जखमी तर 1 बेपत्ता

Video: मुंबईत ग्रांट रोड येथे एका इमारतीला भीषण आग, 3 गंभीर जखमी तर 1 बेपत्ता

मुंबईच्या ग्रांट रोड परिसरात असलेल्या आदित्य आरकेड इमारतीला  सकाळी 6 ते 7 च्या सुमारास आग लागली. या आगीची तीव्रता 3 श्रेणी इतकी आहे . या आगीत 8 ते 10 रहिवासी अडकले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन चालू आहे. या आगीत 3 जण गंभीर जखमी झाले असून तिघांवरही जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दिलीप चौधरी (40) ,अशोक चौधरी (23), भारत चौधरी (23) अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये आणखी एकजण बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू असून धुरामुळे व अति उष्णतेमुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version