परभणी जिल्हातील सेलू कॉलेजच्या मुलीने छेड काढणाऱ्या रोडरोमियोला बसस्थानकावर पायातल्या चपलेने चांगलाच चोप दिला आहे. ग्रामीण भागातून सेलू येथील कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलींची हा रोडरोमियो बऱ्याच दिवसापासून छेड काढत होता. अखेर आज या मुलीने रोडरोमियोला चांगलाच चोप दिला. यावेळी बसस्थानक परीसरात बघ्याची एकच गर्दी जमली होती. दरम्यान चोप देणाऱ्या या बहादूर मुलीचा स्थानिक तरुणांनी घरी जाऊन सत्कार केला आहे.