रक्त व जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तशी योजना आखण्यात येत आहे. राज्यातील दुर्गम भागात तातडीने रक्त व जीवनावश्यक औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने झिपलाइन इंटरनॅशनल इन्कॉर्पोरेशन या कंपनीशी सामंजस्य करार केल्याचंही बोललं जात आहे.
नंदुरबार व पुणे जिह्यात दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात येणार आहे. यशस्वी झाल्यास राज्यातील इतर भागांत ड्रोनचा वापर करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याने ही योजना महत्वकांक्षी मानली जात आहे.
अनेकवेळा रक्त व जीवनावश्यक औषध दुर्गम भागात वेळेत पोहचत नाही आणि पेशंट दगावतो. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसा करार करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने झिपलाइन इंटरनॅशनल इन्कॉर्पोरेशन या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.
ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आहे. त्यामुळे ही योजना कधीही बंद होवू शकते आणि याला राज्य सरकार जबाबदार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.