येत्या रविवारी सरकारी बॅंका सुरू…

येत्या रविवारी सरकारी बॅंका सुरू…

2018-19 आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्च हा रविवारी आला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेला या दिवशीही सरकारी बॅंका सुरू ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे रविवारी बॅंक कर्मचाऱ्यांना कामावर यावं लागणार आहे. आर्थिक व्यवहार सुरू राहण्यासाठी राहण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने संबंधित सरकारी बॅंकाना तसे आदेश दिले आहेत. त्यासाठी RBI कडून बॅंकाना अधिकृत पत्रक पाठवण्यात आलं आहे.

मार्च महिना आर्थिक वर्षांतील शेवटचा महिना असतो.

31 मार्च या तारखेपर्यंतच्या आर्थिक व्यवहार विचारात घेतला जातो.

मात्र नेमका 31 मार्चला यंदा रविवार आहे.

मात्र तरीही सरकारी बॅंका आणि त्यांच्या शाखा चालू ठेवण्याचा  आदेश दिले आहेत.

यासंदर्भात RBI ने शनिवारी म्हणजेच 30 मार्चला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तर 31 मार्चला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बँका सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे सर्वसामान्यांना या दोन्ही दिवशी आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.

त्याचसोबत RTGS आणि NEFT सारखे  आर्थिक व्यवहारही या दिवसांमध्ये नियोजित केलेल्या कालावधीमध्ये करता येतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version