सोलापूरमध्ये दोन पोलिसांना लाच घेताना अटक

सोलापूरमध्ये दोन पोलिसांना लाच घेताना अटक

सोलापूर : पोलीस ठाण्यात मुरूम चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवार म्हणजे ९ जुलै रात्री उशिरा झाली.

पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे अशी लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत. सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करुन गुन्ह्यातून सही सलामत सुटण्याकरिता सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे याच्या करवी १० लाख रूपयाची लाच मागितली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version