राऊतांची भाजपवर टीका

राऊतांची भाजपवर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवार टीकास्त्र सोडले आहे. महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्यामुळे भाजप दंगली घडवून आणत आहे. हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीत भाजपने दंगल घडवून आणली आहे. देशभरात दंगली घडवून आणण्यामागे भाजपचाच हात आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे. तसेच मुंबईतही भोंग्याच्या कारणावरून तणाव निर्माण केलाय, असेही ते म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते यांच्यात सतत टीकांच्या फैरी झडत असतात. अशातच आता अशांतता पसरवण्याच्या प्रकरणी पुन्हा एकदा राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात आणि देशभरात होणाऱ्या दंगलींना भाजपला जबाबदार धरत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. १६ एप्रिल रोजी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हिंसाचार झाला. या दंगलीला भाजप कारणीभूत आहे असं बोललं जातंय. तर, महाराष्ट्रात ही जातीय तेढ निर्माण करून भोंग्याचे प्रकरण तापविण्यात भाजपचा हात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात शांतता टिकून रहावी यासाठी राज्य सरकार तसेच महाराष्ट्र पोलीस प्रयत्नशील आहेत.

समाज माध्यमांवरील पोस्ट पोलिसांनी हटवल्या

मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकूण १२,८०० समाज माध्यमांवरील पोस्ट हटवल्या आहेत. समाजात हिंसाचार पसरवणाऱ्या किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेलेल्या या पोस्ट आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version