मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना आज न्यायालयाचा दिलासा नाही. हेमंत नगराळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चार महिन्याची पोटगीची रक्कम नगराळे यांनी थकवली असल्याची याचिका पत्नीने न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मागणी हेमंत नगराळे यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हेमंत नगराळे यांची मागणी फेटाळली असल्यामुळे नगराळे यांना न्यायालयीन दिलासा मिळाला नाही.
सन २०११मध्ये हेमंत नगराळे यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी कुटुंब न्यायालयाने त्यांना २०००० पोटगी मंजूर केली आहे. तसेच या पोटगीमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांच्या पत्नीने केली आहे. हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकविली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच नगराळे यांच्याकडून असे पहिल्यांदा होत नसल्याचेही त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगितले आहे. त्यामुळे पत्नीचा न्यायालयातला अर्ज रद्द करण्याची मगामी नगराळे यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नगराळे यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे मंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना न्यायालयाचा दिलासा नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.