राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. मात्र कडक निर्बंध लागण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. आज रात्रीपर्यंत राज्यातील कडक निर्बंधाबाबत नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. बैठकित झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री कडक निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा कोणते कडक निर्बंध लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टास्क फोर्ससोबत झालेल्या राज्यातील कोरोनाचा आढावा या बैठकित घेण्यात आला. दरम्यान उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडून देऊ नका, तसेच निधीली कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला दिल्या आहेत.
मंगळवारी राज्यात १८ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मुंबईत सर्वाधिक १० हजार ८६० कोरोना रुग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लागणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर राज्यात आज रात्रीपर्यंत कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.