महाविकास आघाडी सरकारचे निधीवाटप जाहीर

महाविकास आघाडी सरकारचे निधीवाटप जाहीर

महाविकास  आघाडी सरकारचे निधीवाटप जाहीर झाले  असून निधी वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. निधी वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी मिळाला असून सरकारमधल्या शिवसेनेलाच सर्वात कमी निधी मिळाला आहे.

निधी वाटपामध्ये शिवसेना सर्वाधिक निधी मिळवण्यात अपयशी ठरली आहे. तर राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या निधीवाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला असून, दुसऱ्या स्थानी काँग्रेस पक्षाला निधी मिळाला असून शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळाला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे निधीवाटप जाहीर

शिवसेना – ५६ आमदार – ५२ हजार २५५ कोटी

काँग्रेस – ४३ आमदार – १ लाख २४ हजार कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस – ५३ आमदार  – २ लाख २४ हजार ४११ कोटी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version