आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी

आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची आज कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी नितेश राणे आपल्या वकीलासह कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांची एक तास चौकशी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळल्यानतंर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. यासाठी ते सोमवारी वकील संग्राम देसाई यांच्यासह कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांकडून त्यांची जवळपास एक तास चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version