कालीचरण महाराजांना मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून अटक

कालीचरण महाराजांना मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून अटक

महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे चार वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून कालिचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे.

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्या विरोदात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसेला त्यांनी नमस्कार केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रायपूर, अकोला आणि पुण्यात करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून पोलिसांनी अटक केली आहे.

कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांनी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. तसेच काँग्रेस नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आणि अखेर त्यांना मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version