वर्ध्यात नवजात अर्भकांना दफन केल्याचं उघड

वर्ध्यात नवजात अर्भकांना दफन केल्याचं उघड

वर्ध्यातील आर्वीयेथील प्रतिष्ठित कदम रुग्णालयात बेकायदेशीररीत्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कदम रुग्णालयाची झडती घेतली. दरम्यान रुग्णालयाच्या मागे असलेल्या खड्ड्यात पोलिसांना गर्भपात केलेल्या अर्भकाचे काही अवयव सापडले असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे. तसेच जमिनीत दफन केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झाला असून या तपासात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी कदम रुग्णालयाच्या महिला डॉ. रेकखा कदम यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच वर्ध्यातील आर्वी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. तर रुग्णालयाची नोंदवहीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या नोंदवहीमध्ये किती जणांचे गर्भपात झाले असल्याची माहिती आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास विशेष पथकाद्वारे होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version