नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केली ४५० संत्र्याच्या झाडांची कत्तल

नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी केली ४५० संत्र्याच्या झाडांची कत्तल

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्याला संत्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते. येथील संत्राची देश विदेशात निर्यात केली जाते. मात्र सद्यपरिस्थिती पाहता अमरावती जिल्ह्यातील संत्र उत्पादक हवालदिल झाला आहे. संत्राला विविध रोगांनी ग्रासले आहे. परिणामी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील राजेंद्र जगाते या शेतकऱ्यांने चार एकर शेतात असलेल्या ४५० संत्र्याच्या झाडाची कत्तल केली आहे.

अमरावतीमधील शेतकऱ्यांच्या संत्राच्या फळपिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांचा खर्च देखील निघेणासा झाला. त्यामुळे अमरावतीमधील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. संत्र्यावर रोगाचा प्रादुर्भआव झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नसल्याने नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने ४५० संत्र्याच्या झाडांची कत्तल केली आहे.

वरुड मोर्शी तालुक्यात संत्राच्या सर्वाधिक बागा आहेत. मात्र संत्रा उत्पादक अनेक बाबींना कंटाळून संत्रा बागा नाहीश्या करत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास या भागातील संत्राच्या बागा नाहीश्या व्हायला वेळ लागणार नाही. संत्रा उत्पादकांच्या व्यथा लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने याकडे लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version