रायगड, ६ जून २०२३, प्रतिनिधी : किल्ले रायगडावर मंगळवारी, (दि.६ जून रोजी) छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक साेहळा माेठ्या दिमाखात साजरा होत आहे.
या सोहळ्याला आता युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित आहे. नाणे दरवाजा येथून संभाजी राजे रायगडावर पोहोचले आहेत.
ढोल ताशांच्या गजरात युवराज संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यानिमित्त दरम्यान किल्ले रायगडावर इतिहासात नोंद व्हावी इतकी अफाट गर्दी झाली. किल्ले रायगडवर एक लाखाहून अधिक शिवभक्त दाखल झाले आहेत. तर, तेवढीच गर्दी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी झाल्याने मध्य रात्री शिवप्रेमींसाठी गडावर प्रवेश बंद करण्यात आला. किल्ले रायगडावरील प्रवेश बंदीमुळे शिवप्रेमी नाराज झाले आहेत. तसेच रस्त्यावरील परीस्थिती पाहिली तर माणगाव आणि महाडच्या दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे महाड ते रायगड रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली.
या सर्व बाबींवर शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेता यावे, त्यांना अभिवादन करता यावे यासाठी भाजपाचे संभाजीराजे यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी ट्विट करत शिवप्रेमींनी गड चढण्याची गडबड करुन नये असे आवाहन देखील केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.